राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेची रॅली…

393

गडचिरोली: आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय,अत्याचाराच्या विरोधात* आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने गडचिरोली येथे आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल रॅली काढण्यात आली.तसेच मा.जिल्हाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय,अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण भारतात एकाच वेळी,एकाच दिवशी तीन टप्यात देशव्यापी चरणबद्ध आंदोलन करण्यात आले.त्यातील जिल्हास्तरीय रॅली प्रदर्शन हा तिसरा टप्पा होता.
आदिवासी समाजाने वेगवेगळी लढाई न लढता राष्ट्रव्यापी संघटनेला जुडून एक विचारधारा,एक उद्देश्यासाठी चळवळीचा हिस्सा बनून कार्य करण्याची खरी गरज आहे. मूलनिवासी बहुजन समाजाची संघटित शक्ती तयार केल्याशिवाय समस्यांचे समाधान करता येणार नाही.संघटित शक्ती तयार करून राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभे करन्याकरिता आदिवासीनी पुढे यावे तरच आदिवासींची अस्मिता टिकविता येईल असे प्रतिपादन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरीश मंगाम यांनी केले.
ह्या जिल्हास्तरीय रॅलीचे नेतृत्व संयोजक डॉ. एस.बी.कोडापे,कोवे महाराज,मधुकर वेलादी,कालिद