प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे मदत कक्षाचे उद्घाटन…

337

दिपक साबने,जिवती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व स्टॅपी संस्था पुणे यांच्या सहकार्याने व प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूर द्वारा प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे संवाद व मदत कक्षाचे उद्घाटन अंजनताई भिमराव पवार, सभापती पंचायत समिती जिवती यांच्या हस्ते करण्यात आले सध्याच्या काळात सर्व शासकीय रुग्णालयात कोविड – 19 च्या संदर्भात सेवा देण्यात व्यस्त आहेत अशा अटीतटीच्या काळात शासकीय आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे त्यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेत येणाऱ्या रुग्णास योग्य माहिती मिळवून देण्याच्या सकारत्मक हेतूने संवाद मदतकक्षाचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे करण्यात आले.

या उद्घाटन कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती, अंजनताई भिमराव पवार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रामदास अनकाडे, डॉ अंकुश गोतावळे प्रकृती संस्थेचे संचालक निलेश देवतळे, रुग्णकल्याण समिती सदस्य राजेश राठोड, प्रल्हाद मदने व भिमराव पवार सर उपस्थित होते.
उदघाटन कार्यक्रमात बोलताना अंजनताई पवार यांनी सांगितले की मदत कक्ष स्थापन झाल्यामुळे नागरिकांना लसीकरणविषयी समज गैरसमज, कोविड – 19 विषयी माहिती तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मातृवंदन योजना, जननी सुरक्षा योजना व रुग्णालयातीलसेवा सुविधा इत्यादी विषयक माहिती व सल्ला व मार्गदर्शन या केंद्रातून प्राप्त होईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश देवतळे जिल्हा समन्वयक प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूर , संचालन
शाहीर संभाजी ढगे तालुका समन्वयक प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूर यांनी केले.
सदर मदत कक्ष सुरू करण्यास संतोष चतरेश्वर रुग्ण कल्याण समिती जिल्हा समनव्यक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे सहकार्य लाभले.