मुंबई-नाशिक महामार्गावर पिकअपने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी नाही..

320

-दिपाली गायकवाड (प्रतिनिधी)

इगतपुरी : मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाट माथ्यावर टोप बावडीजवळ मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या पीकअप (एम.एच. १५, ईएल ०६६१) या पिकअप गाडीने शॉर्टसर्कीटमुळे पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान साधल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी यावेळी घटनास्थळी धाव घेत घटनेची दखल घेऊन वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणली. याप्रसंगी अर्धा तास महामार्गाची वाहतूक ठप्प झाली होती.

यावेळी महामार्ग सुरक्षा विभागाचे कर्मचारी व रूट पेट्रोलिंग ऑफिसर रवी देहाडे, दीपक मावरीया, संदीप म्हसने, फायर मॅन फिरोज पवार, प्रमोद भटाटे, नितीन रुपवटे, महामार्ग पोलीस घोटीचे सहाय्यक उपनिरीक्षक हिरे, सहाणे, किरण आहेर, एच. पी. गुजरे, आपत्ती व्यवस्थापन टीमचे दत्ता वातडे यांनी परिश्रम घेतले. या घटनेचा पोलीस पथक अधिक तपास करीत आहे