धो-धो पावसाने संत्रा नगरी जलमय; नागपुरकरांनी अनुभवला थंड गारवा..

351

मुकुल पराते (नागपूर शहर प्रतिनिधी)

नागपूर. नागपुरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. सतत ४ तास कोसळल्या मुसळधार पावसामुळे शहरातले रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आलेले आहे. मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड झाली. शहरातील सीताबर्डी, गणेशपेठ, अजनी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहने पाण्याखाली आली आहेत.

मुसळधार पावसामुळे ऑनलाईन फूड डिलेव्हरी पूर्णपणे ठप्प झाली आहे, तर दुसरीकडे पावसाचा जोर पाहता अनेक दुकाने उघडलीच नाही.गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उंन्हाने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना आज थोडा गारवा अनुभवायला मिळाला.