जगण्यासाठी लागते भाकर; पिकवणाऱ्या बळीराजालाच नेहमी मिळते ठोकर…गट विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे यांची मुलाखती दरम्यान खास बातचीत…

641

नागेश इटेकर
गोंडपिपरी , तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी : काल दिनांक ११/६/२०२१ रोजी येथील स्थानीक गट विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे यांच्याशी रक्ताच पाणी करून, उन्हा तान्हात स्वतःला झिझवत शेतात सोन पिकवणारा जगाचा पोशिंदा बळीराजा विषयी खास बातचीत करण्यात आली.तेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी असे मनोगत व्यक्त केले की, देशातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे.सुका/ ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस, हवामान बदल यामुळे नेहमीच पिकाचे उत्पन्न चागलं येत नाही. कृषीमाल दिर्घकाळ टिकण्यासाठी सक्षम आधुनिक सामुग्री बनविण्यासाठी शेतकरी हितासाठी संशोधन होण्याची आज काळाची गरज आहे.सद्या शेतीच्या पेरणीची कामे सुरू झाली असून वरुणराजा देखील शेतकऱ्यांवर चांगलाच मेहेरबान आहे.वरुणराजाची अशीच अशिम कृपा पिकाच्या हंगामापर्यंत राहिली तर शेतकऱ्यांना समोर वाईट दिवस पाहायला मिळणार नाही.

पिकली तर शेती नाहीतर माती..
एकट्या शेतीवर कितीतरी कुटुंबे अवलंबून आहेत. यामध्ये शेतकरी, शेतमजूर, खत उत्पादक व विक्रेते , औषध उत्पादक व विक्रेते, अवजार उत्पादक व विक्रेते, सिंचन सुविधा उत्पादक व विक्रेते, इतर कृषी साहित्य उत्पादक व विक्रेते, माल वाहतूक करणारे, हमाल, व्यापारी, विक्रेते, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी विभाग, रेशन दुकाने, असंख्य कारखाने, पोल्ट्री,प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असंख्य कामगार, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जमा होणाऱ्या करामुळे चालणारे सरकार इतकं सगळं एका शेतीवर अवलंबून असताना शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणे हे अतिशय दुःखदायक आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा कृषी क्षेत्र आहे.आता कुणी शहाणपणा करून जर असं म्हणत असेल की, मद्य विक्रीतून सर्वाधिक महसूल मिळतो तर लक्षात असू द्या मद्य देखील शेतमाला पासूनच तयार होते. वडापाव पासून बर्गर, पिझ्झा, चिप्स, तेल, कडधान्ये, आयुवेर्दिक औषधे, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत, पाळीव प्राणी असे सर्वच कृषीवरच अवलंबून आहेत. बहुतांश उत्पादनांचा कच्चा माल हा कृषीमालच असतो. त्यामुळे तो पिकवणाऱ्याला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे.शेतकरी जगेल तरच देश टिकेल. असे भावनिक आणि शेतकऱ्यांच्या हितोपयोगिक दृष्टीकोनातील चांगले मत गट विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे यांनी इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला दीलेल्या मुलाखती दरम्यान व्यक्त करण्यात आले.