Home Breaking News माळशेज घाटात कार वर दरड कोसळली...पण नशीब चांगलं चहा शौकीन असलेल्या दोन...

माळशेज घाटात कार वर दरड कोसळली…पण नशीब चांगलं चहा शौकीन असलेल्या दोन मित्रांचे प्राण चहाने वाचले…

ब्युरोचिफ प्रशांत शाहा*
*कल्याण :* एका चहामुळे अनेक टेन्शन दूर होतात असे म्हटले जाते. मित्रांसोबत गप्पा मारताना हा चहा एक उत्तम साथीदार होतो. मात्र याच चहामुळे दोन मित्रांचे प्राणही वाचले जाऊ शकतात यावर कोणी विश्वास ठेवेल का…? पण खरंच असं घडलं आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर एका कारवर दरड कोसळली. माळशेज घाटात पोहोचल्यावर कारमधील दोघांना चहाची पिण्याची इच्छा झाली होती. कार रस्त्याच्या कडेला पार्क करुन चहा घेण्यासाठी हॉटेलजवळ पोहोचले. त्याचवेळी त्यांनी पार्क केलेल्या कारवर अचानक दरड कोसळली.
मुसळधार पावसात माळशेज घाटात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. माळशेज घाट परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.
त्यातच दरड कोसळून दुर्घटना घडली, परंतु सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही अथवा जीवितहानी झाली नाही.
अहमदनगर इथे राहणारा मुकुंद बसवे हा तरुण काल आपल्या मित्रासह आपल्या वडिलांना आणण्यासाठी गाडीने कल्याणच्या दिशेने निघाला होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास ते दोघे गाडीने माळशेज घाटात पोहोचले. यावेळी चहा पिण्याची इच्छा झाल्याने त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली. कारमधून उतरुन चहाच्या दुकानजवळ पोहोचले असतानाच अचानक त्यांच्या गाडीवर दरड कोसळली.
या दुर्घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने मुकुंद आणि त्याचा मित्र गाडीतून उतरल्याने सुखरुप बचावले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय या दोघांनाही आला.
दरम्यान गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केल्याने वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर काम करुन दरड हटवली.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितले.

राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये...

सांगली हादरल! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं

सांगली – म्हैसाळकारांचा सोमवारचा दिवस उजाडला तोच एका हादरवणाऱ्या बातमीनं.. गावात परिचित असलेल्या दोन भावांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती काही क्षणांत गावातल्या घराघरात...

मोठी बातमी: जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान.. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

चक्रधर मेश्राम पुणे: जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कँसरचे निदान झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमटे यांना दुर्मिळ अशा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपुर श्रमिक पत्रकार भवन में डिजिटल कार्यशाला |

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: डिजिटल मीडिया का प्रसार प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए एक बड़ी चुनौती है। डिजिटल मीडिया वास्तव में क्या...

खेलो इंडिया : क्रीडा सुविधांची माहिती ३० जूनपर्यंत मागविली

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: केंद्र शासनाने " खेलो इंडिया " पोर्टल कार्यान्वीत केले आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय/खाजगी शाळा, महाविद्यालय,संस्था,तसेच संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रीडा...

शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका… 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी करा… कृषी विभागाचे आवाहन

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात 13 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 16 जूनपर्यंत वाशिम तालुक्यातील राजगाव महसुल मंडळात 78.9 मिमी, वारला...

पीसीपीएनडीटी कार्यक्रम: खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) या कार्यक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम येथील डॉ.सारसकर...

Recent Comments

Don`t copy text!