Maharashtra Lockdown: मोठा दिलासा! १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे उठणार…

1837

मुंबई: निर्बंध शिथील होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील जनतेला मोठा दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पाच टप्प्यांत शिथील होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार आहेत. करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.