संपूर्ण राज्यातील आदिवासी उपयोजन क्षे़त्रातील शाळा/तुकड्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले.अशा शाळांना १५ वर्षापेक्षा जास्त कालखंड होऊनही नियमित वेतन अनुदान मंजूर होत नसल्यामूळे त्यांचे २ ते ३ महीने वेतन होत नाही.त्यामूळे अशा शाळेत कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांना दरमहा वेतन होत नसल्यामूळे आर्थीक अडचणीचा सामना करावा लागतो त्यांचे जीवन विमा हप्ते,गृहकर्ज हप्ते,पतसंस्थेच्या कर्जाचे हप्ते नियमित भरल्या जात नसल्यामूळे व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.अनेक शिक्षकांना कोवीड-१९ ची लागण झाल्यामूळे उपचारार्थ दवाखान्यात भरती व्हावे लागले. नियमित वेतन होत नसल्यामूळे त्यांच्या समोर आर्थीक प्रश्न निर्माण झाला आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येते की,आदिवासी उपयोजन क्षे़त्रातील (लेखाषिर्शक १९०१) शाळा/तुकडयांना बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये रूपांतरीत करून नियमित वेतन अनुदान मंजूर करण्यात यावे व दरमहा ०१ तारखेला वेतन अदा करण्यात यावे या मागणीच्या पुर्ततेसाठी कोवीड-१९ साथरोगाच्या नियमाचे पालन करून शुक्रवार दिनांक ०४/०६/२०२१ ला सर्व शिक्षकांनी कुटूंबासह एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह मा.सुधाकर अडबाले यांचे नेतृत्वात संपूर्ण विदर्भात करण्यात येत आहे. सदर मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री,शिक्षणमंत्री यांना मा.शिक्षणाणिकारी (माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचे मार्फत पाठविण्यात येत आहे.
तरी सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष श्री.केशवराव ठाकरे,जिल्हाकार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्षमणराव धोबे, उपाध्यक्ष सुनिल शेरकी,नामदेव ठेंगणे,गंगाधर कुनघाडकर,मंजुषा धाईत, कोषाध्यक्ष दिंगाबर कुरेकर, सहकार्यवाह अनिल कंठीवार,शालिक ढोरे, नितीन जिवतोडे, सोनाली दांडेकर, मा.वर्गीय प्रतिनीधी, दिपक धोपटे, सल्लागार,मारोतराव अतकरे, प्रमोद कोंडलकर, देवराव निब्रड, श्रीराम भोयर, संघटक, सचिन तपासे, मनोज वासाडे, रामदास आलेवार, धनंजय राऊत, रंजना किन्नाके, क.म.वि.प्रमुख, ज्ञानेश्वर सोनकुसरे, प्रसिध्दी प्रमुख, प्रभाकर पारखी, आंनद चलाख यांनी शिक्षकांना आवाहन केले आहे.
Advertisements
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन…
Advertisements
Recent Comments
Advertisements
Advertisements