गडचिरोली* : गडचिरोली वनविभागातील वनपरिक्षेत्रात गोगाव – महादवाडी गावालगत वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना आज सोमवार सकाळी आठ वाजता घडली. कल्पना दिलीप चुधरी (३५) असे मृतक महिलेचे नाव आहे. गडचिरोली वनपरिक्षेत्रातील गोगाव नियतक्षेत्रात कल्पना दिलीप चूधरी (३५) हे तेंदूपत्ता संकलन च्या काम चालू असताना, त्यावेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करीत त्यांच्या नरडीचा घोट घेतला आजू बाजूच्या लोकांनी आरडाओरड केला असतांना वाघ जंगलात पसार झाला, माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून गावकऱ्यांना शेतात तसेच गावाला लागून असलेल्या जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत.
Home Breaking News ब्रेकिंग न्यूज: तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला…महिला जागीच ठार…