झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरची महिला कार्यकारणी गठीत…गोंडपिपरीच्या भाजपा महिला शहर अध्यक्षांची सचिव पदी नियुक्ती…

725

नागेश इटेकर / तालुका प्रतिनिधी

पूर्व विदर्भातील झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील महिला साहित्यिकांनी या भागात बोलली जाणारी बोलीभाषा अवगत करून या बोलीभाषेतून लेखन व्हावे आणि ह्या भाषाचे संवर्धन व्हावे या दृष्टिकोनातून झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांनी आभासी प्रणालीद्वारे चंद्रपूर जिल्हा महिला समिती गठित करण्यात आली. यामध्ये मुल येथील सुप्रसिद्ध कवयित्री प्राचार्य रत्नमालाताई भोयर (नगराध्यक्षा) यांची अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष म्हणून अॕड.सारिका जेनेकर राजुरा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्ष अंजूमन शेख बल्लारपूर,सविता सातपुते- कोट्टी चंद्रपूर,सचिव अरूणा जांभुळकर गोंडपिपरी,सहसचिव वृंदा पगडपल्लीवार मुल,संगिता बांबोळे गोंडपिपरी,भावना खोब्रागडे सिंदेवाही, संघटक शितल कर्णेवार देवाडा, मंजुषा दरवरे उर्जाग्राम, लिना भुसारी चिमूर, वंदना राऊत घुग्गूस,अश्वीनी रोकडे चिमुर यांची निवड केंद्रीय मंडळाच्या बैठकीत करण्यात आली.

निवड झालेल्या सर्व महिला साहित्यिक मंडळींचे झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, प्रा.डॉ. धनराज खानोरकर , अरूण झगडकर यांनी अभिनंदन केले आहे.