Home Breaking News ब्रेकिंग न्यूज! पिकअप-दुचाकीच्या जोरदार धडकेत युवकाचा जागीच मृत्यू…गोजोली-वटराणा जवळची घटना…

ब्रेकिंग न्यूज! पिकअप-दुचाकीच्या जोरदार धडकेत युवकाचा जागीच मृत्यू…गोजोली-वटराणा जवळची घटना…

2498

गोंडपिपरी: गोंडपिपरी-धाबा मार्गावर असलेल्या गोजोली वटरणा याच्या मधोमध जंगल परिसरात लहान पुलाजवळ झालेल्या पिकअप-दुचाकीच्या जोरदार धडकेत युवकाचा जागेवर मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास MH-31-EN-0395 या नंबर च्या पिकअपने MH-34-AS-3788 या नंबरच्या टुव्हीलरला जोरदार धडक दिल्याने टुव्हीलर चालक नामे अंकुश हरी नेवारे वय वर्ष अंदाजे 28 राहणार कुडेनांदगाव हा इसम जागीच ठार झाला. अंकुशचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Don`t copy text!