Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात 15 नवीन कोरोना बाधित तर 3 कोरोनामुक्त..

गडचिरोली जिल्ह्यात 15 नवीन कोरोना बाधित तर 3 कोरोनामुक्त..

466

गडचिरोली, दि.01: आज जिल्हयात 15 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9583 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9347 वर पोहचली. तसेच सद्या 130 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 106 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.36 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.

नवीन 15 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 15 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 3 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 3, जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील साईनगर 4, गोकुलनगर 1, जेल क्वार्टर 2, कलेक्टर कॉलनी 2, सर्वोदय वार्ड 1, येरगांव 1, आर्शिर्वाद नगर 2, गणेश नगर 1, रामनगर 1, यांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 0 जणांचा समावेश आहे.
******

Don`t copy text!