राजेश बसवेश्वर हजारे यांना शिवछत्रपती आदर्श समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार…

434

चंद्रपूर-संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थे कडून राजेश बसवेश्वर हजारे यांना शिवछत्रपती आदर्श समाजरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांचा विविध कार्याची पावती म्हणून संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष मा. सानप साहेब व संस्थेचे सचिव भवर साहेब यांनी हा पुरस्कार राजेश हजारे यांना प्रदान केले. तसेच राजेश हजारे यांनी म्हटले की संजीवनी परिवाराने जे माझावर विश्वास दाखवले आहे त्यावर मी योग्य ठरून संजीवनी परिवाराचा विकास व विस्तार करण्यात मोलाचे योगदान देणार व भविष्यात संजीवनी परिवाराचा व्याप फक्त महाराष्ट्रात नसून संपू्ण भारतात करण्यासाठी आमचा परिवार तयार आहे तसेच संजीवनी परिवाराचा विश्वास माझावर असाच कायम असूद्या असे राजेश हजारे म्हटले. त्यांनी या पुरस्काराचा श्रेय त्यांचे वडील बसवेश्वर हजारे तसेच आई सत्यमा हजारे व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पी. इंगोले सर व उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माध्दमशेटीवार सर, कला विभाग प्रमुख डॉ. प्रकाश शेंडे सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शंभरकर सर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय सोमाकुवर सर, रा.से.यो. प्रमुख प्रा. कुलदीप गोंड सर, तसेच त्यांचे आदर्श प्रा.अशोक तीतरमारे सर, भोयर सर, शेख सर इत्यादी गुरुजनाना दिले. तसेच नेहमी त्यांचा पाठीशी असणारे चेतन इदगुरवार, नितीन घरत, सतीश मेंढे, शुभम लोखंडे,ओमकार मोहूर्ले, मनिकंठ गादेवार, राघव सुलवावार तसेच संपूर्ण मित्रपरिवाराला दिले. त्यांनी केलेल्या कार्याचेसर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.