ब्रेकिंग न्यूज! सततच्या नापिकीमुळे तरुण शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या…

823

गडचांदूर: कोरपना तालुक्यातील निमनी येथील युवा तरुण शेतकरी मंगेश तिखत यांनी सततच्या नापिकीमुळे आणि कर्जाच्या ओझ्याखाली असल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
काल शेतात जाऊन विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी गडचांदूर येथे नेत असतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या तरुण शेतकऱ्यामागे आई वडील, पत्नी आणि एक तीन वर्षांची मुलगी आहे. या शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केला जात आहे.