Advertisements
Home Breaking News लाचलुचपत पथकाच्या हातावर तुरी देऊन दोन पोलीस हवालदार फरार...

लाचलुचपत पथकाच्या हातावर तुरी देऊन दोन पोलीस हवालदार फरार…

नागेश इटेकर
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी

Advertisements

गोंडपिपरी: येथील पोलिस ठाण्यात कार्यरत दोन पोलीस आणि एका होमगार्ड कर्मचाऱ्यांकडून पोलीस खात्याला काळीमा फासणारी घटना काल (दि.२) ला सुमारे सहा वाजताच्या दरम्यान घडली.गडचिरोली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्विकारतांना विवेक राणा नामक होमगार्डला घटनास्थळी रंगेहाथ पकडले.

या घटनेतील मुख्य सुत्रधार असलेल्या पोलीसाला पकडले असता ठाणेदार यशवंत राऊत यांना जोराचा धक्का देत घटनास्थळावरून पसार झाले.
फारार झालेल्या पोलिसांचे (आरोपी) नावे विचारले असता देवेश कटरे आणि संतोष काकडे असे सांगण्यात आले. सध्या ते दोन (आरोपी) पोलीस फरार असून लाच लुचपत पथक गडचिरोली त्यांचा शोध घेतआहे.

प्राप्त माहितीनुसार,गोंडपिपरी येथील एक प्रतिष्ठित युवकाचे ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय आहे. आणि ट्रकचालक-मालक हि तोच आहे. काही दिवसांपासून फरार पोलीस हवालदार देवेश कटरे आणि त्याचे सहकारी मिळुन त्या ट्रक मालकाला खाकी रुबाब दाखवत दमदाटी करत होते.हातचे आरोप लावत तू दारूचा व्यवसाय करतो. तुझ्या बाबत आम्हाला वारंवार तक्रारी मिळाल्या पण त्याकडे आम्ही कानाडोळा करीत होतो. आम्हाला दहा हजार रुपये दे नाहीतर तुझ्यावर कार्यवाही करतो, असे घडु द्यायचे नसेल तर मला दहा हजार रूपये दे अशी मागणी फरार असलेले पोलीस आरोपीनी व्यावसायिकाला केली.

सदर तरूणाला ही गोष्ट मनातल्या मनात खात होती. लॉक डाऊन मध्ये तिन चार महिने खाली होतो शिथिलता आल्यापासून व्यवसायाला सुरुवात झाली पण पाहिजे तसा व्यवसायाला तेजी नाही आणि अश्यात या भ्रष्ट व लालची पोलिसांची दादागिरी. त्यांना पैसे दिले नाही तर गाडी चालु देणार नाही, कधीना कधी ते मला वांद्यात आनतीलच म्हणून तो त्यंना पैसे देण्याच्या विचारात होता पण त्याची तशी मुळीच इच्छा नव्हती. अशात त्याला युक्ती सुचली आणि लागलीच त्या तरूणाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीला गांभीर्याने घेत संबंधीत विभागाच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास स्थानिक गोंडपिपरी गांधी चौकात सापळा रचला.

पोलीस हवालदार देवेश कटरे याने आपल्या सहकारी होमगार्ड विवेक राणा याला तक्रार कर्त्या युवकाकडून रक्कम स्विकारण्यास सांगितले.रक्कम स्वीकारताच घटनास्थळी उपस्थित असलेले लाचलुचपत विभागाचे ठाणेदार यशवंत राऊत आणि त्यांच्या पथकाने विवेक राणा या होमगार्डला घटनास्थळीच रंगेहाथ पकडले.यावेळी हजर असलेले पोलीस हवालदार देवेश कटरे आणि संतोष काकडे यांनाही पकडण्यात आले.मात्र त्या दोघांनीही ठाणेदार राऊत यांना जोराचा धक्का देऊन अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

लाच लुचपत पथका चे ठाणेदार यशवंत राऊत यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,दोन पोलीस कर्मचारी फरार घोषित करून त्यांचेवर लाच लुचपत प्रतिबंधात्मक कायदा १९८८ नुसार कलम ७/१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून समोरील तपास सुरू असल्याचे सांगीतले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

तिथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचत नाही…विद्यार्थी कधी ऑटोने तर कधी जातात पिकअप वरती बसून…

बळीराम काळे, जिवती जिवती:(तालुका प्रतिनिधी) माणिकगड पाहाडावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील तसेच जिल्ह्याच्या पश्चिम व दक्षिणेला तेलंगणा राज्याची सीमा लागून असलेला अतिदुर्गम व अतिमागास अशी...

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

तिथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचत नाही…विद्यार्थी कधी ऑटोने तर कधी जातात पिकअप वरती बसून…

बळीराम काळे, जिवती जिवती:(तालुका प्रतिनिधी) माणिकगड पाहाडावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील तसेच जिल्ह्याच्या पश्चिम व दक्षिणेला तेलंगणा राज्याची सीमा लागून असलेला अतिदुर्गम व अतिमागास अशी...

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!