प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चेकनांदगाव आणि चेक पारगाव ग्रामपंचायत पेपरलेस घोषित…

773

नागेश ईटेकर(गोंडपीपरी)प्रतिनिधी

ग्रामपंचायतीचा कामात गतिमानता,एकसूत्रात आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने आपले सरकार योजनेत ई-ग्रामसॉफ्ट ही संगणक प्रणाली तयार केली आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासहिता २०११ अन्वये ग्रामपंचायतीच्या एकूण दप्तरांची संख्या ३३ असून कागदपत्रांची माहिती आज प्रर्यंत लिखित स्वरुपात ठेवली जायची.आणि ठेवत होते,महाराष्ट्र शासनाच्या या ‘आपले सरकार सेवा केंद्र ’ अंतर्गत ई-ग्रामसॉफ्ट प्रणालीतून सर्व १ ते ३३ नमुने अद्यावत ठेऊन जेव्हा पाहिजे तेव्हा कोणतेही प्रमाणपत्र किवा अहवाल एका क्लिक वर प्राप्त करणे हि आता काळाची गरज झाली आहे.

“गावकऱ्यांच्या सोयीसाठी आणि पारदर्शक सेवेसाठी पेपरलेस प्रणाली अत्यंत योग्य आहे. यामुळे कामे वेळेवर होत आहेत. ही संकल्पना संपूर्ण ग्रा.पं.ने राबवावीअसे ईनमूलवार
प्रशासक ग्रामपंचायत चेकनांदगाव व चेकपारगाव यांनी इंडिया दस्तक टीव्ही न्यूज शी बोलतांना सांगितले.

ग्रामीण भागात उदभवनाऱ्या परिस्थितीवर मात करून पेपरलेस ग्रामपंचायत झाली आहे. या ग्रामपंचायतीची सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. या ग्रामपंचायतीनी ‘आपले सरकार’ योजनेतील ई-ग्रामसॉफ्ट नावाची संगणक प्रणाली बनवली आहे. त्यामुळे संबंधीत ग्रामस्थांना ३३ प्रकारचे दाखले ग्रामपंचायत मधून ऑनलाईन प्राप्त होत आहेत. यातच ग्रामपंचायतिचे काम पेपरलेस करण्याचा मानस जिल्हा परिषदेचा आहे. डीजीटल इंडियाच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतिचे दैनंदिन कामकाज ऑनलाईन करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. आर्थिक व्यवहारासह विविध नोंदी संगणकावर सुरु झाल्या आहेत. यासाठी म्हणून ग्रामपंचायतिचे १ ते ३३ नमुने संगणकाद्वारे देण्यासाठी ग्रामविकास विभागाने आपले सरकारच्या सेवा केंद्रातील ई-ग्रामसॉफ्ट विकसित केले आहे.
ग्राम विकास विभागाच्या आदेशानुसार १ एप्रिल पासून या आदेशाची काटेकोर अमलबजावणी करण्यात येत आहे. ‘आपले सेवा सरकार केंद्र’ या प्रकल्पाचे प्रमुख उदीष्ट ग्रामपंचायत स्तरावरून आयटी संसाधनाच्या सहायाने महाराष्ट्रतील सर्व ग्रामपंचायत संगणकीकृत करणे, या सोबतच नागरिकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात सेवा देणे, कामकाजात पारदर्शकता आणणे ही बाब कौतुकास्पद आहे.. वार्षिक कर मागणी, वसुलीसाठी कामाचे देयक, मोजमाप वही, ग्रामपंचायत लेखा परीक्षण पूर्तता वही त्यावर मालमत्ता माहिती , रस्त्याची माहिती, जमिनीचे नोंदणी पुस्तक, कर्मचारी पगारपत्रक, कामाचे देयक, कामाचे अंदाजपत्रक नोंदवही, वार्षिक कर पावतीचे कामे इत्यादी ई-ग्रामसॉफ्ट मध्ये झाली आहे. त्यामुळे त्याचा कारभार आता पेपरलेस बनला आहे. मालमत्ता कर, रहिवासी, वीज जोडणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र, शौचालय दाखला, विवाह नोंदणी दाखला, हयातीचा दाखला, वयाचा दाखला व असे विविध दाखले या माध्यमातून ऑनलाईन दिले जात आहेत. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या हस्तलेखी नोंदी बंद करण्यात आल्या असून सर्व प्रकारचे दाखले आता संगणकीकृत पद्धतीने देण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या ई-ग्राम अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीचे कामकाज राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून हे काम हाती घेतले आहे.