Homeचंद्रपूरगोंडपिंपरीभाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार-तहसिलदार के.डी.मेश्राम

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यात गणेशपिपरी,सुकवासी व अनेक गावात मोठया प्रमाणावर भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत.यापैकी काही शेतकरी बांधव थेट व्यापाÚयांना विकतात.तर काही शेतकरी गोंडपिपरीतील गुजरीच्या माध्यमातून व्यवसाय करतात.थेट व्यापाÚयांना सरसकट माल विक्री करीत असल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होते.हे नुकसान थांबविण्यासाठी नगरपंचायत प्रशासनासोबत समन्वय साधून भाजीपाला उत्पादक शेतकÚयांसाठी स्वंतत्र सुविधा उभारण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन तहसिलदार के.डी. मेश्राम यांनी केले.
तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने आज विकेल ते पिकेल या संकल्पनेअंतर्गत संत सावता माळी रयत बाजार योजनेच्या माध्यमातून शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस्था उपक्रमाचे उदघाटन करतांना ते बोलत होते.
तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार,मंडळ कृषी अधिकारी पानसर,गोलाईत अदिंची यावेळी उपस्थिती होती.गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावात मोठया प्रमाणावर शेतकरी उत्पादक आहेत.त्यांच्याकरिता गोंडपिपरीत ंस्वतंत्र सुविधा नसल्याने भाजीपाल्याच्या व्यापारी जिथे बसतात.तिथेच त्यांना आपला माल विकावा लागतो.सोबतच अनेक शेतकरी बंांधव सरसकट कमी भावात ठोक व्यापाÚयांना माल विकून मोकळे होतात.परिणामी त्यांना मोठा फटका सहन करावा लागतो.शेतकरी बांधवांनी पिकविलेल्या पिकांना योग्य तो भाव मिळावा,व त्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यत पोहचविला जावा या हेतूने कृषी विभागाने जनजागृतीसाठी हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी दिली.
या उपक्रमासाठी गणेशपिपरी,सुकवासी येथील अनेक शेतकÚयांनी सहभाग घेतला कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे कल्पना चैैधरी,प्रदीप पुरमशेटटीवार,प्रज्ञा देवगडे,सुनीता बाम्हणकर, जे.डी.चंदनबाटवे,रमा महिला बचत गट,सावित्रीबाई बचत गट,श्री.विनायक बचट गट,धनश्री महिला बचत गटाच्या महिलांनी सहकार्य केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!