आमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…

0
554

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना बेकायदेशीररित्या दारूचा मोठा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या समर्थकांनी 7 ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

चंद्रपूरमध्ये दारुबंदी ही कागदावरच असल्याची घटनासमोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणुका संपल्यानंतर देशी दारूचा मोठा साठा शहराकडे येत होता. स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या समर्थकांनी शहराच्या एंट्री पॉईंटवर शहरात येणारा 7 ट्रक भरून देशी दारूचा साठा पकडला. पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि समर्थकांनी जिल्ह्यात बेधडक येणारे ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
गेले काही महिने जिल्ह्यातील दारूबंदी विरोधातील पोलीस कारवाई थंडावल्याची कुजबुज सुरू झाली आहे. जप्त करण्यात आलेला दारुचा साठा आणि मुद्देमाल 50 लाखांहून अधिक रकमेचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुलडाणा पासिंग चे हे ट्रक शेकडो पोलीस ठाणे आणि जिल्ह्यातील नाकेबंदी चुकवून जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचल्याने पोलिस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here