चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : आरोग्य सेवेतील कोरोना योद्ध्यांकरिता जिल्ह्यात दाखल झालेल्या कोविशिल्ड लस साठ्याची आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली. 20 हजार लसीचे डोज जिल्हा परिषद आवारातील औषधी भांडारच्या शीतकक्षामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. लस सुरक्षीत ठेवण्यात आले असल्याचे पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी या कोरोना लस बाबत जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांचेकडून माहिती घेतली.
जिल्ह्यात 16 जानेवारीला चंद्रपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर व पठाणपुरा आरोग्य केंद्रात तसचे वरोरा, ब्रम्हपुरी व राजुरा येथील सहा केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यावेळी आरोग्य सेवेतील नऊ हजार लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोज देण्यात येणार असून पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांनाच 28 दिवसानंतर दुसरा डोज देण्यात येणार आहे.
कोरोना लस साठ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून पाहणी…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
RELATED ARTICLES