Homeचंद्रपूरकोरपनाचंद्रपुर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू...

चंद्रपुर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू…

शेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

चंद्रपूर येथील खरेदी केंद्राला भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मुल हे तालुके जोडण्यात आले आहेत. तसेच वरोरा केंद्रला वरोरा तालुका, चिमुर केंद्राला ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभिड तालुके, गडचांदुर केंद्राला कोरपना व जिवती तालुके तर राजुरा खरेदी केंद्राला गोंडपिपरी हे तालुके जोडण्यात आले असून संबंधीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे दिलेल्या केंद्रावर तुर खरेदीसाठी नोंदणी करावी.

शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शेतीचा 7/12, बँक खाते पासबुक, इ. संपुर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.आ.गोगीरवार यांनी कळविले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!