HomeBreaking Newsवर्धा मार्गावरील खापरी-मिहान पुलाजवळ झालेल्या अपघातात ४ जण ठार १ गंभीर जखमी...

वर्धा मार्गावरील खापरी-मिहान पुलाजवळ झालेल्या अपघातात ४ जण ठार १ गंभीर जखमी…

नागपूर:-प्रतिनिधी

भरधाव वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील पाचपैकी चौघांचा करुण अंत झाला. वर्धा मार्गावरील खापरी-मिहान पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये कार चालकासह दोन तरुणींचाही समावेश आहे. ते सर्वच्या सर्व मिहानमधील एक्झावेअर टेक्नॉलॉजि लिमिटेडचे कर्मचारी होते.

कंपनीत गुरुवारी डे-नाईट शिफ्ट आटोपल्यानंतर मध्यरात्री १ वाजता ते आपल्या घराकडे परतीच्या प्रवासाला निघाले. मिहानमधील बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांना कंत्राट दिले आहे. अशाच एका वाहनातून अर्टिका – एमएच ३१ – एटी २५९६ क्रमांक च्या वाहनातून पियुष टेकाडे (वय २५, रा. कोराडी रोड, नागपूर), नेहा गजभिये (वय २५, रा. वंजारी लेआऊट, उप्पलवाडी, कामठी रोड), पायल कोचे (वय २७, रा. महेंद्रनगर, टेका), आशिष सरनायल (वय २७, रा.चक्रधर नगर, बोखारा) हे चार कर्मचारी आपल्या घराकडे निघाले. बालचंद्र उईके (वय ३४, रा. काचोरेनगर, चिंचभवन) हा वाहन चालवित होता. वाहनाची गती जास्त होती. अशाच वेगात समोरून येणाऱ्या एका अवजड वाहनचालकाने या अर्टिका वाहनाला जोरदार धडक मारली. ही धडक एवढी जबरदस्त होती की बऱ्याच दूरपर्यंत त्याचा आवाज आला. कारच्या समोरचा भाग पुरता चक्कनाचूर झाला होता. वाहनचालकासह पाचही जण कारमध्येच चेंदामेंदा झाल्यासारखी अडकून पडली.

दरम्यान, कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी वाहनेही तेथे थांबली. माहिती कळताच कंपन्यांचे अधिकारी, सोनेगाव पोलीस तसेच गस्तीवरील पोलिसांचा ताफाही धावला. कसे बसे सर्व जखमींना बाहेर काढून मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी आशिष सरनायक वगळता सर्वांना मृत घोषित केले. सचिन बबन सुटे (वय ३९, रा. शताब्दी चौक) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला.

या अपघातामुळे मिहान परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातापुर्वी हे सर्व कर्मचारी हसत खेळत आपल्या सहकाऱ्यांना निरोप देऊन वाहनात बसले. काही वेळेतच त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याचे वृत्त कंपनीत पसरले अन् अनेकांना जोरदार धक्का बसला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!