कोरोना महामारीच्या काळात काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळविण्याच्या दृष्टीने संघटन सुरु

571

अक्षय पाटील नंदुरबार प्रतिनिधी

राज्यातील आरोग्य विभागात सुमारे ५० टक्केहून अधिक विविध सवर्गांची पदे रिक्त आहेत.शासनाने कोरोना महामारीच्या काळात कमी कालावधीसाठी परिचारिका,वॉर्डबॉय,सफाई कामगार,विविध तंत्रज्ञ नेमले आणि काम संपताच कमी केले.मुळात रिक्तपदांच्या परिणामी आरोग्य व्यवस्था कोलमडलेली असताना अशा कर्मचाऱ्यांना गरजेनुसार वापरुन कमी करणे हा कृतघ्नपणा आहे.

कोरोनाच्या भीतीने कर्मचारी यायला धजावत नसताना या कर्मचाऱ्यांनी दिलेली माणुसकी सेवाभाव याचा विचार करता या सर्वांना शासनाने कायम स्वरुपी सेवेत घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचने मुख्यमंत्री महोदयांसह सबंधितांकडे केली आहे.तरी याप्रश्नी पाठपुरावा करण्यासाठी शासकीय,निमशासकीय,खाजगी आस्थापनेत ज्यांनी ज्यांनी याकामी सहभाग घेतला अशांनी नाव,पत्ता,फोनसह 9552 340 340 या नंबरवर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन समविचारीचे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अक्षय पाटील यांनी केले आहे.