चंद्रपूर जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णसंख्या २० हजारच्या पार

0
197

चंद्रपूर- जिल्ह्यात मागील २४ तासात चार कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला असून १६७ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. यासोबतच सुरवातीपासून आतापर्यंत बाधीत झालेल्यांची एकूण संख्या २० हजार ११५ वर पोहचली आहे. ७२ जणांनी कोरोनावर मात केल्याने काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १७ हजार ९०४ झाली आहे. सध्या १ हजार ९०५ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार ९४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख २८ हजार ४०८ नमुने निगेटीव्ह आले आहेत. मंगळवारी मृत झालेल्या बाधितामध्ये कटवाल भद्रावती येथील ५९ वर्षीय महिला, वडगाव चंद्रपूर येथील ६२ वर्षीय पुरूष, चिंचाळा, चंद्रपूर येथील ६० वर्षीय पुरूष तसेच सावरघाटा, सिंदेवाही येथील ४१ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३०६ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २८३ , तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १४ , यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधीत आलेल्या १६७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील ६६, चंद्रपूर तालुक्यातील ११, बल्लारपुर तालुक्यातील १५ भद्रावती ११, ब्रम्हपुरी दोन, सिंदेवाही एक, मुल १२, पोभुर्णा एक, गोंडपीपरी एक, राजुरा १०, चिमुर चार, वरोरा २७ , कोरपना एक व इतर ठिकाणच्या ५ रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here