Advertisements
संघपाल गवारगुरु
जिल्हा प्रतिनिधी अकोला
Advertisements
ता. २८ बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील २६ वर्षीय शेतकरी पुत्राने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्या केलेला मुलगा हा वाडेगाव येथील भोईपुरा भागात राहणाऱ्या पुरुषोत्तम पिलातरे यांचा पुत्र असून योगेश त्याचे नाव आहे. योगेशने आज सकाळी तामशी रस्त्यावर असलेल्या काळे यांच्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना दुपारी १२ वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वाळेगाव चौकीचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मनोज वासोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी रवींद्र आहेरकर, निखिल सूर्यवंशी यांनी पंचनामा केला. योगेश पिलातरे यांच्या वडिलांच्या नावाने शेती आहे. सततची नापिकी व कर्ज पोटी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
Advertisements
Advertisements