पर्यटन स्थळ तर झालेच पण पर्यटकाला जाण्याकरिता मार्गच नाही…

0
539

जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली:

Advertisements

गडचिरोली जिल्यातील चामोर्शी तालुक्यात कर्मवीर कन्नमवार जलाशय(दीना धरण) रेगडी या ठिकाणी असलेल्या धबधबा परिसरात मागील दोन वर्षांपूर्वी चिल्ड्रेन पार्क,वॉच टॉवर,बोटिंग व अशा अनेक काही पर्यटकांचे लक्ष वेधणारी सुविधा येथे वनविभागांनी उपलब्ध केले आहे.
परंतु या पर्यटक स्थळाला येणाऱ्या पर्यटकांना धरणाचा बांध असलेल्या रस्त्याने जावे लागते.
त्या रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने येथे अनेकदा अनेक चारचाकी वाहन खराब होत आहेत. कार सारख्या लहान वाहन घेऊन येणाऱ्या पर्यटकाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात अनेक वाहन चिखलात फसत असल्याच्या पण घटना अनेकदा घडलेल्या आहेत.
या संदर्भात दीना व वनविभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन पार्क कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे
असे रेगडी गावकऱ्यांकडून बोलले जात आहे. या मुळे रेगडी या गावाला विकासाची चालना मिळेल हे नक्की…

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here