जानाळा ते मुल रस्‍त्‍याच्‍या दुरूस्‍तीचे काम 15 दिवसात सुरू करावे अन्‍यथा आंदोलन – आ. सुधीर मुनगंटीवार

0
166

चंद्रपूर:- जानाळा ते मुल या रस्‍त्‍याची अवस्‍था अतिशय दयनीय झाली असून या रस्‍त्‍यावर सातत्‍याने होणारे अपघात लक्षात घेता या रस्‍त्‍याच्‍या दुरूस्‍तीचे काम येत्‍या 15 दिवसात सुरू न झाल्‍यास नागरिकांसह तिव्र आंदोलन करण्‍याचा ईशारा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

चंद्रपूर जिल्‍हयातील जानाळा ते मुल या रस्‍त्‍याची अवस्‍था अतिशय दयनीय आहे. हा रस्‍ता राष्‍ट्रीय महामार्ग आहे. विशेषतः या मार्गावरील रोपवाटीकेनजीकचा परिसर अतिशय वाईट अवस्‍थेत आहेञ या रस्‍त्‍याच्‍या दयनीय अवस्‍थेमुळे नागरिकांना, वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन  करावा लागत आहे. अपघाताचे प्रमाण सुध्‍दा वाढलेले आहे.

यासंदर्भात आपल्‍या विभागाला वारंवार अवगत करूनही त्‍याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्‍त्‍याचे बांधकाम करणा-या कंत्राटदारावर एफआयआर दाखल करून रस्‍त्‍याची सुधारणा तातडीने करण्‍याची आवश्‍यकता आहे. या रस्‍त्‍याच्‍या दुरूस्‍तीचे काम येत्‍या 15 दिवसात सुरू न झाल्‍यास आंदोलन छेडण्‍याचा ईशारा आ. मुनगंटीवार यांनी राष्‍ट्रीय महामार्ग विभागाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here