सावधान! शेतशिवारात आता वन्यप्राण्याऐवजी होतो माणसांपासून धोका…

0
632
Advertisements

राजेंद्र झाडे

गोंडपीपरी:- परिसरात धान कापणी झाली असून अनेकांच्या शेतात धानाचे ढिगारे लावले गेले आहेत. शेतातील धान्य आता घरी येतील या आशेवर कित्येकजण आनंदी आहेत. पण गेल्या दोन तीन दिवसात शेतशिवारात अग्नितांडव बघायला मिळत आहे. कारण नुकतंच आक्सापुर येथे दोन शेतातील धानाचे पुंजणे जाळून राख करण्यात आली. तेव्हा अनेकांच्या तोंडातून एकच सूर निघत आहे की आता वन्यप्राण्यापासून नाही तर माणसापासूनच धोका निर्माण झाला आहे.

Advertisements

गोंडपीपरी तालुक्यातील गेल्या तीन-चार दिवसांत आक्सापुरातील घटना ताजी असतांना आज सकाळी धाबा या गावाजवळील कोंढाणा गावातील धानाच्या ढगाला एका अज्ञान व्यक्तीने आग लावली. हे शेत राजू येनमपल्लीवार नामक व्यक्तीचे आहे.
परिसरात अश्या घटना वारंवार घडत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशती वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा असेच म्हणावे लागेल की, वन्यप्राण्यापासून कमी आणि माणसांपासून जास्त धोका निर्माण झाला आहे..

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here