मंदिर उघडले आणि चोरट्यांनी दानपेटी फोडून रक्कम घेऊन पळाले…

891

गोंडपीपरी:- नुकतेच सरकारने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. परवानगी मिळाल्यानंतर अनेक प्रार्थनास्थळे उघडल्या सुद्धा जात आहेत. अश्याच एक धक्कादायक बातमी पुढे आली ती म्हणजे चक्क मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डाव साधला होता.

गोंडपीपरी तालुक्यातील धाबा हे गाव. या गावामध्ये संत परमहंस कोंडय्या महाराज यांचे देवस्थान आहे. हे देवस्थान महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्रप्रदेश येथील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात दुरदुरुन मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

कोरोनामुळे अनेक दिवसांपासून हे देवस्थान बंद होते. आज मंदीर उघडल्यानंतर जो प्रकार दिसला ते बघून देवस्थान प्रशासनाला धक्काच बसला. चक्क मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी दानपेटीतील संपत्ती पळवली. इतकेच नाही तर चोरी कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी त्यांनी मंदिर परिसरात लावले गेलेल्या सीसीटीव्हीवर पोते गुंडाळले. तसेच वायर सुद्धा कापून टाकले होते.
हा सर्व प्रकार बघितल्यानंतर देवस्थान प्रशासनाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून या प्रकरणाचा पुुढील तपास धाबा पोलीस करीत आहे.