गोंडपीपरी तालुक्यातील नांदगाव फुर्डी येथील शेतकऱ्यांनी विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

0
1412

गोंडपीपरी प्रमोद दुर्गे:-

Advertisements

दिवाळी सणानिमित्त घरी रंग-रांगोळी केलेली, दिव्याचा प्रकाश सगळीकडे चमकत असतांना, पंच पक्वान्नही बनविले. दिवाळीचा सण कुटुंबासह अति आनंदात्त केला,
पण मनात काहीतरी वेगळे होते. कर्जाचा डोंगर त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हता. मनात विचाराची कुजबुज चालूच होती, घाईघाईत सकाळचे जेवण आटोपले आणि घरामागे असलेल्या विहिरीत उडी घेऊन त्याने आपली जिवनयात्रा संपवली.

Advertisements

गोंडपीपरी तालुक्यातील नांदगाव (फुर्डी) येथील शेतकरी नीलकंठ फकिरा आमने वय 45 वर्ष यांनी आज दिनांक 15 नोव्हेंबर ला सकाळी 11 :30 च्या सुमारास घरालगत असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

नीलकंठ आमने हा कुटूंबप्रमुख होता , त्यांच्यावर संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी होती, त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकट आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार असून त्यांच्या जाण्याने आमने कुटुंबासह गावपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे…

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here