रशियातील एका सोशल मीडिया स्टारने आपली सव्वा कोटी रुपयांची लक्झरी कार जाळून टाकली. कार नादुरुस्त झाल्याने त्याने हे कृत्य केले व त्याचा व्हिडीओही बनवला. मिखाईल लिटविन असे या प्रसिद्ध यूट्यूबरचे नाव आहे.
Advertisements
या माणसाने ही महागडी कार केवळ पंधरा हजार किलोमीटरच चालवली होती. मात्र, या कारमध्ये सतत काही तरी बिघाड होत होता. गेल्या दहा महिन्यांमध्ये त्याने ही कार अनेक वेळा दुरुस्तीसाठी दिली होती. मात्र, तरीही या कारमध्ये समस्या येत असल्याने त्याने रागाच्या भरात ती जाळून टाकली. त्याबाबतचा व्हिडीओ पाहून अनेक लोकांना हा त्याचा पब्लिसिटी स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Advertisements
Advertisements