Advertisements
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याची ओळख जास्त तापमान असलेला जिल्हा म्हणून असतांना आता याच जिल्ह्यात मागील काही दिवसापासून जोरदार थंडी पडत आहे. थंडीपासून सरंक्षण व्हावे म्हणुन आज गरजू आणि गोर गरिब ,वयोवृद्ध लोकांना ब्लॅंकेट, स्वेटर, तसेच लहान मुलांना कपडे, स्वेटर, शूज(नविन आणि जुने चांगल्या स्थितीत) यांचे वाटप चंद्रपूर रेल्वे स्टेशन, महाकाली मंदिर, शनि मंदीराजवळ करण्यात आले. या प्रसंगी शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, बालाजी वॉर्ड अध्यक्ष मंगेश बोकडे, आशीष खिरटकर, आकाश मेले, निलेश यांची उपस्थिती होती. लोकांनी साहित्य स्वीकारून त्याचा लगेच वापर केल्याने फार समाधान वाटले.
Advertisements
Advertisements
Advertisements