दिवाळी अवकाश देण्याची मागणी
चंद्रपूर : — गोंडवाना विद्यापीठाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या सत्र 20- 21 या शैक्षणिक दिनदर्शिकेत दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या हिवाळी सुट्ट्यांचा समावेश नाही दिवाळीनिमित्त किमान पंधरा दिवसाच्या सुट्ट्या देण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने केली आहे.
गोंडवाना विद्यापीठातील संलग्न महाविद्यालये विद्यापीठाच्या निर्देशानुसार 15 जून पासून नियमितपणे सुरू असून प्रवेश प्रक्रिया, आभासी अध्यापन कार्ये व विद्यापीठ परीक्षेचे कार्य अध्यापकांना द्वारे नियमितपणे पार पाडले जात आहेत. कोरोना टाळे बंदीतही शासनाने व विद्यापीठाने महाविद्यालये सूरु ठेवण्यासंबंधीच्या वेळोवेळी निर्गमित केलेलीआदेशाचे पालन अध्यापकाकडून आणि महाविद्यालयाकडून काटेकोरपणे पालन गेले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अमरावती,नांदेड येथील विद्यापीठांनी दिवाळी अवकाश घोषित केलेल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने या वर्षीचे सत्र 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले असले तरी गोंडवाना विद्यापीठात या शैक्षणिक सत्रात 15 जुन पासूनच सर्व अध्यापनाचे व शैक्षणिक कार्य काटेकोरपणे सुरू आहे या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ द्वारा 15 दिवसाच्या दिवाळीनिमित्त सुट्ट्या देण्यात याव्यात अशी मागणी गोंडवाना यंग टीचर असोसिएशन केली असून संघटनेतर्फे कुलगुरूंना निवेदन देण्यात आले आहे.कुलगुरूच्या वतीने मा. कुलसचिव डॉ. ईश्वर मौहुर्ले यांनी निवेदन स्विकारुन सकारात्मक प्रतिसाद दिले. यावेळी संघटनेचे सचिव प्रा.विवेक गोरलावर,उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते,उपाध्यक्ष डॉ.राजू किरमिरे सहसचिव डॉ. प्रमोद बोधाने, डॉ. लता सावरकर,डॉ. किशोर कुडे,डॉ. भंडारकर, डॉ, रुपेश कोल्हे,डॉ.राजेंद्र गोरे,डॉ. अभय लाकडे,प्रा.संजय राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.