मुल येथे उलगुलान संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न

1212

रक्तदान शिबिराला युवकांचा मोठ्याप्रमाणात उस्फुर्त सहभाग

मुल

कोरोनाच्या महासंकट काळात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये याकरिता उलगुलान संघटना शाखा मुल द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मुल शहरातील तथा तालुक्यातील असंख्य युवकांनी जवळपास ५० च्या वर युनिट रक्तदान केले. रक्तदान हेच महादान हा संकल्प ठेवून उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या उस्फुर्तपणाने सहभाग घेऊन रक्तदानाचे कार्य केले. उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात अत्यंत उत्तम पद्धतीने रक्तदानाचे कार्य पार पडले.उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय परिश्रम करुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले याबद्दल उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांनी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच रक्तदात्यांचे आभार मानले.
सदर रक्तदान शिबिराचे आयोजन अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडणारे उलगुलान संघटना शाखा मुल चे अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, अक्षय दुमावार, वतन चिकाटे, आरिफ खान पठाण, अजय दहिवले, साहिल खोब्रागडे, निहाल गेडाम, हर्षल भुरसे, मिटुसिंग पटवा तथा असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.