आक्सापूर पशुवैद्यकिय दवाखान्यात परिचर करतो पशुवर उपचार ; पशुपर्यवेक्षकाचे दुर्लक्ष ;गोंडपिपरी यंग ब्रिगेटची कार्यवाहीची मागणी

436

गोंडपिपरी

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या आक्सापूर येथिल पशु वैद्यकीय रूग्णालयात चक्क परिचर पशुवर उपचार करित आहे.येथिल पशु वैद्यकीय अधिकार्याचे रूग्णालयाकडे मोठे दूर्लक्ष सूरू या प्रकाराने शेतकरी संतापले आहेत.दरम्यान पशुपर्यवेक्षकावर कार्यवाही करण्याची मागणी गोंडपिपरी यंग ब्रिगेटचे अध्यक्ष सूरज माडूरवार यांनी केले आहे.

आक्सापूर येथे पशु वैद्यकीय रूग्णालय आहे. या रूग्णालयात मोठाच भोंगळ कारभार सूरू आहे. येथिल पशु वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहतात. त्यामुळे या रूग्णालयात आलेल्या पशुवरती येथील परिचर उपचार करित असतो. या प्रकाराने शेतकरी संतापले आहेत.