डोंगरगावातील नळांना पंधरा दिवसापासून पाणी नाही

0
137
Advertisements

 

भंगाराम तळोधी / राजू झाडे

डोंगरगावातील नळ योजना पंधरा दिवसापासून बंद पडली आहेत.त्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून बोअरवेलचा पाण्याने गावकरी तहान भागवित आहेत.

Advertisements

डोंगरगावाला धाबा -गोजोली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेत बारा गावांचा समावेश असून बारा गावे योजनेवर अवलंबून आहेत. या योजनेची डोंगरगावला जाणारी पाईप लाईन लिक झाल्याने गावातील पाणी पुरवठा ठप्प पडला आहे. परिणामी गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावात असलेल्या दोन हातपंपाचा पाण्यावर गाव तहान भागवित आहे. हातपंपाचे पाणी भरण्यासाठी महीलांची तोबा गर्दी उसळत आहे. मागिल पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा ठप्प आहे. लिक झालेली पाईप लाईन दूरस्त करण्यासाठी दिरंगाई सूरू आहे.याप्रकारावर गावकर्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here