वाढदिवसाची अनोखी भेट ; वृध्दांना दिला काठीचा आधार

0
247

 

गडचांदूर ( चंद्रपूर )

वाढदिवस हा आनंदाचा दिवस.हा आनंद साजरा करण्यासाठी नातेवाईक,मित्रांच्या संगीतीने अनेकजण ऐन्जाय करतात. अश्यात बिबी येथिल उपसरपंचांनी गावातील वृध्दांचा आधार असलेली काठी वाटप केली.जवळपास ५० वृध्दांना त्यांनी काठीचा आधार दिला. या अनोख्या भेटीने वृध्द गहीवरले.

स्मार्ट गाव बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांचा वाढदिवस सध्या चर्चेत आहे.
वाढदिवसी देरकरांनी गावातील ५४ वयोवृद्ध महिला व पुरुषांना वृद्धवस्थेत काठीचा आधार म्हणून काठ्या वितरित केल्या.सोबतच गावातील कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ जणांचा कोरोना योद्धा म्हणून गौरविले. त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपसरपंच आशिष देरकर यांनी वाढदिवसाचा दिवशी जोपासलेली सामाजिक बांधिलकी चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वस्तरातून देरकर यांचे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here