Homeदेश/विदेशदेवमाश्याने उलटी केली अन तो झाला करोडपती..!

देवमाश्याने उलटी केली अन तो झाला करोडपती..!

तैपई, 16 ऑक्टोबर : एक तैवानी (taiwan) नागरिक एका निर्जन बेटावर फिरत होता. त्याला शेणासारखा एक दगड दिसला. त्याला काय आहे माहीत नव्हतं पण त्या दगडातून सुगंध येत होता. त्यामुळे कसंतरी करून त्याने तो दगड गाडीत टाकून घरी आणला आणि या दगडामुळे तो श्रीमंत झाला. वाचल्यानंतर तुम्हाला ही एखादी गोष्ट वाटेल मात्र ही खरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी तैवान वेबसाइटवर प्रसिद्ध झाली आहे.

तैवानमधील एका व्यक्तीला निर्जन बेटावर समुद्रकिनाऱ्यावर एक दगड सापडला. तो घरी घेऊन आल्यानंतर त्याने त्याबाबत माहिती काढली. तेव्हा हा दगड नसून ती व्हेलची (Whale) उलटी होती हे त्याला समजलं. देवमाशाची उलटी समुद्रात राहून दगडासारखी कडक झाली होती.

या दगडाला एंबरग्रीस म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सोन्याहून अधिक आहे. तब्बल 4 किलोंचा हा दगड विकला आणि 1.5 कोटी रुपये मिळवले. त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

देवमाशाच्या शरीरात एक मेणासारखा पदार्थ तयार होतो. तो त्याला स्क्विड या जलचराच्या काट्यापासून वाचवतो. सामान्यपणे देवमासा विष्ठेवाटे किंवा उलटीतून हा पदार्थ शरीराबाहेर टाकतो. हा पदार्थ शरीराच्या बाहेर पडल्यावर समुद्राच्या पाण्यामुळे आणि वातावरणामुळे घट्ट शेणासारखा होतो. या पदार्थाला शास्रज्ञ एंबरग्रीस म्हणतात. बाल्टिक समुद्रकिनारी मिळणाऱ्या एंबरसारखा हा पदार्थ दिसतो त्यामुळे त्याला एंबर म्हटलं जातं. काही जण त्याला माशाची विष्ठा मानतात तर काही जण उलटी. एंबरग्रीसला काही वर्षांनी खूपच सुंदर वास येतो.

एंबरग्रीस हे काळ्या रंगाचं मेणासारखं मऊसर आणि ज्वलनशील असतं. बहुतेकवेळा अत्तर आणि इतर सुगंधी उत्पादनांमध्ये एंबरग्रीसचा वापर होतो. ग्रीसच्या प्राचीन संस्कृतीत लोक एंबरग्रीसची उदबत्ती किंवा धूप तयार करायचे आताचे ग्रीक लोक त्याचा उपयोग सुगंधी सिगारेट तयार करण्यासाठी करतात. प्राचीन चीनमध्ये त्याला ड्रॅगनने थुंकलेला सुगंध म्हणायचे. युरोपात ब्लॅक एजमध्ये त्याचा वापर प्लेगपासून बचावासाठी केला जायचा. खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी जेवणात, लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही केला जायचा. मध्य युगात युरोपात एंबरग्रीस हे डोकेदुखी, सर्दीवरचं औषध म्हणूनही वापरलं जायचं.

अजूनही अनेक प्रकारे एंबरग्रीस वापरलं जातं त्यामुळे जागतिक मार्केटमधील त्याची किंमत सोन्याहून जास्त आहे. एंबरग्रीस जेवढं जुनं होतं तितकी त्याची किंमत वाढते. ऑनलाइनही याची विक्री केली जाते. शास्त्रज्ञ याला तरंगणारं सोनं म्हणतात. याचं वजन 15 ग्रॅमपासून 50 किलोंपर्यंत असू शकतं.

सामान्यपणे देवमासा हा समुद्रात दूरवर राहतो किनाऱ्यावर क्वचितच येतो. पण त्याने समुद्रात उलटी केली तर एंबरग्रीस वाहत वाहत समुद्रकिनाऱ्यावर येतं. त्यामुळे अनेक मच्छिमार त्याचा शोध घेत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबईत आणि देशाच्या विविध भागांत पोलिसांनी घातलेल्या छाप्यात एंबरग्रीस सापडलं होतं. देवमाशाची उलटी गरीब मच्छिमारांचं आयुष्य बदलून टाकू शकते. कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यावरही देवमाशाचं दर्शन घडायला लागल्यापासून मच्छिमार तिथं पाण्यात दबा धरून बसतात आणि देवमाशाची उलटी मिळवण्याचा प्रयत्न करतात.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!