बाप रे बाप..! या आठ वर्षाचा मुलीचा बेस्ट 11 फुट लांबीचा अजगरफ्रेंन्ड आहे

0
429
Advertisements

लहान मुलांना कुत्रा किंवा मांजरींचा लडा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण जर कुणी सांगितलं की, एका ८ वर्षीय मुलीचा ‘बेस्ट फ्रेन्ड’ अजगर आहे तर खरंच विश्वास बसणार नाही. इस्त्राइलमधील एका मुलीचा स्वीमिंग बडी अजगर आहे. जेव्हा तिच्या घराच्या बॅकयार्डातील स्वीमिंग पूलमध्ये उतरते तेव्हा तिचा पाळीव अजगरही तिच्यासोबत असतो. या अजगराचा आकार पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. सामान्यपणे लहान मुले साध्या पालीला बघूनही घाबरतात, पण ही मुलगी ११ फूट लांब अजगरासोबत खेळते.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इनबर असं या मुलीचं नाव असून ती तिच्या पालकांसोबत साऊथ इस्त्राइलमध्ये एका एनीमल सॅंक्युरीमध्ये राहते.

Advertisements

ती बालपणापासूनच प्राण्यांसोबत राहते, त्यांच्यासोबतच ती वाढली आहे. बेले(अजगराचं नाव) त्याच पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा इनबरने बेलेसोबतच सर्वात जास्त वेळ घालवला. दोघांची पक्की मैत्री झाली. इनबरला सापांसोबत फिरणं आणि खेळणं आवडतं. कधी-कधी ती सापाची कात काढण्यात आणि कोरोना दरम्यान आनंदी राहण्यात त्यांची मदत करते. इनबरची आई Sarit Regev ने सांगितले की, ‘इनबर अनेक साप आणि इतरही प्राण्यांमध्ये मोठी झाली आहे. जेव्हा ती लहान होती तेव्हा आंघोळ करताना बेले तिच्यासोबतच राहत होता. आता दोघेही मोठे झाले आहेत. दोघेही सोबत राहतात. हे आमच्यासाठी नॉर्मल आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here