Homeचंद्रपूरगोंडपिंपरीकेंद्र सरकारचे शेतकरीविरोधी नवीन तीन कायदे समूळ रद्द करा

केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी नवीन तीन कायदे समूळ रद्द करा

गोंडपिंपरी काँग्रेसची मागणी

गोंडपिपरी/सुरज माडुरवार

केंद्रातील भाजप सरकारने विकासाचा लॉलीपॉप दाखवून कोरोणा महामारी संकटात सापडलेल्या व टाळेबंदी काळामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत आलेल्या देशातील शेतकरी, शेतमजूर व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांच्या विरोधात संसदेत नवीन शेतकरीविरोधी कायदा पारित करून शेतकऱ्यांना पुन्हा मूठभर व्यापाऱ्यांच्या गुलामगिरीत ढकलण्याचे जे षड्यंत्र रचलेले आहे. हे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणाऱ्या असून केंद्राने देतील नवीन शेतकरीविरोधी कायदे पारित केलेला आहे ते समुळ रद्द करावे. अशी मागणी गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना पाठविले ल्या निवेदनातून केली आहे.

दिलेल्या निवेदनात केंद्र सरकार च्या वतीने आजवर केवळ सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशाच पडली आहे. विविध प्रलोभने व विकासाच्या नावावर डंका पिटून जाहिरातबाजी आणि थोटांड अश्या थापाड्या मारून सर्वसामान्यांच्या भ्रमनिरास करणाऱ्या मोदी सरकारने यंदा देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांची काळी आई हीच्या पोटून होणाऱ्या उत्पन्न त्याचा मलींदा शेतकरी शेतमजूर व शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबियांना न मिळता केवळ काही मुठभर व्यापाऱ्यांना मिळावा या हेतूने संसदेत नवीन तीन शेतकरी कायदे पारीत करण्यात आले. मात्र पारित करण्यात आलेल्या शेतकरी विषयक कायद्यांमध्ये शेतकरी हित कमी आणि व्यापारी जास्त असे असून शेतकऱ्यांनी काढलेले उत्पन्न हे मूठभर व्यापाऱ्यांच्या हाती जाऊन मग त्याच व्यापाऱ्यांकडून संपूर्ण जगभर बेभाव विक्री अशी भविष्यकाळात चित्र बघावयास मिळणार असून शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा गहाण होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे देशातील संपूर्ण शेतकरी शेतमजूर व शेतकऱ्याचे कुटुंब यांचे जीवनमान अंधकारमय होण्याची दाट शक्यता असून संसदेने दोनी सभा गृहात पारित करण्यात आलेले शेतकरी विरोधी कायदे हे समूळ रद्द करून देशातील अन्नदाता शेतकरी बांधवांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गोंडपिपरी तहसीलदारांमार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदनातून केली आहे. यावेळी गोंडपिपरी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, कृउबा समितीचे सभापती सुरेश चौधरी, नगराध्यक्ष सपना साखलवार , काँग्रेस महिला आघाडीच्या शीला बांगरे,संचालक शंभुजी येलेकर, माजी तालुकाध्यक्ष राजीव सिंह चंदेल, तालुका उपाध्यक्ष नामदेव सांगळे, अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष गौतम झाडे,शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, वासुदेव सातपुते, अनिल झाडे, वासू नगारे, युवक तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, बबलू कुळमेथे व बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!