कोरोना योद्धांचे खासदार बाळू धानोरकरांनी वाढविले मनोधैर्य

0
390

सैनिकी शाळा, वनअकादमी येथे आकस्मिक भेट देऊन व्यवस्थेची पहाणी

चंद्रपूर : मागील सहा महिन्यापासून कोरोना विषाणूने थैमान मांडला आहे. कोरोना विषाणूने बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या रुग्णांना सुरवातीकाळापासूनच सैनिकी शाळा, वनअकादमी येथे ठेवण्यात येत आहे. येथील रुग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना भेटण्याकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी उपस्थित कोरोना योध्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य वाढविले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधिकारी मनपा डॉ. खंडारे, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव ऍड. मालक शाकीर, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल रझा, एन. एस. यु. आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, एन. एस. यु. आय जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, पप्पू सिद्धीकी यांची उपस्थिती होती.
आज दि. २७ सप्टेंबर ला खासदार बाळू धानोरकर यांनी सैनिकी शाळा, वनअकादमी येथे कोविड केंद्रांना आकस्मिक भेट देऊन स्वतः परिस्थितीची पाहणी त्यांनी केली. यावेळी भोजन व्यवस्था देखील त्यांनी बघितली. येथील परिचारिकांना सोबत संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येथील रुग्णांवर केल्या जात असलेल्या उपचाराची आत्मीयतेने विचारपूस केली. सर्व परिस्थितीची माहिती घेऊन पुढे देखील काही परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांना सूचना केल्यात.
आधी १० दिवसात रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होत होती, आता मात्र २५ दिवसात दुपटीने वाढ होत आहे. हि बाब दिलासा देणारी असली तरी येत्या काळात आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याकरिता तातडीने ऑक्सिजन व अतिदक्षता युक्त एक हजार खाटांचे रुग्णालय उभे होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार करण्याकरिता आता आरोग्य यंत्रणेवर येत असलेला ताण कमी होणार आहे. वाढती रुग्णाची संख्या लक्ष्यात घेता तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येतील अशी माहिती खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here