पोलीसांच्या बेजबादरपणामुळे ग्रामविकास अधिकारी सभेला मुकला

1066

 

गोंडपिपरी

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणा रोगाचे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले.असताना गोंडपिपरी पोलीस व नगर प्रशासन कार्यवाहीला लागले आहेत.मागील अनेक दिवसापासून शहरात मास्क न लावलेल्या लोकांवर दंडात्मक कार्यवाही सुरू आहे.अशावेळी काल सायंकाळी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील ग्राम विकास अधिकाऱ्यावर प्रशासनाने कार्यवाहीचा बडगा उगारला. त्यांच्यावर ५०० रुपया चा दंड ठोकला.असता त्यांनी सदर रक्कम भरण्यास नकार दर्शविल्यानंतर यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांच्या गाडीची चावी मागितली. दुसऱ्या दिवशी दंडाची रक्कम भरल्यानंतर अजून पर्यंत पोलिसाकडून संबंधिताला त्याची चावी दिली नसल्यामुळे तो कोविड ९० या सभेला अनुपस्थित राहिल्याचा प्रकार घडला आहे. तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागा झाला असताना पोलीस व नगर पंचायतीमार्फत शहरात माक्स न लागणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोहीम राबविली जात आहे, सदर मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे.अशावेळी काल सायंकाळी गोंडपिपरी येथे वास्तव्यास असलेल्या भंगाराम तळोधी येथील ग्राम विकास अधिकारी प्रशासनाच्या हाती लागला .तो आपल्या दुचाकी वर प्रवास करीत असताना त्याने मास्क लावला नव्हता.यावेळी उपस्थित पथकात समावेश राहिलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून दंडाच्या रकमेची मागणी केली. मात्र आशिक सुखदेवे यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते दंड भरला नाही.तेव्हा उपस्थित पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकी चावी मागितली.सुखदेवे यांनी सांगितल्यानुसार त्यांनी पोलिसांना चाबी दिली.सदर घटनेच्या दुसऱ्या दिवशी ग्रामविकास अधिकाऱ्याने नगरपंचायत दंडाची रक्कम भरली. व पावती घेऊन वंदिराम पाल पोलिसाकडे गेला. असता त्याने तुमच्याकडून मी चाबी घेतलीच नसल्याचे सांगितले. दुसरीकडे हा अधिकारी सकाळपासूनच या भानगडीत राहिला. परिणामी त्यांच्या ग्रामपंचायत क्षेत्रात आज कोविंड ९० या पूर्वनियोजित बैठकीला ग्राम विकास अधिकारी यांनी दांडी मारली .आजच्या दिवशी या महत्वपूर्ण विषयावर आयोजित मिटींगला पाठ फिरवून त्यांनी बेजबाबदारपणा दाखविला. आजच्या दिवशी कुठलीही रजा मंजुरी न करता किंवा सुट्टीचा अर्ज न टाकतात हा अधिकारी दिवसभर गोंडपिपरी शहरात भटकताना अनेकांनी बघितले. गोंडपिपरी शहरातील जुना बस स्थानक परिसरात हा प्रकार घडला .दरम्यान कालच नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळापासून अधिकाऱ्याने आपली वाहन ढकलत स्वतःच्या घरी सुरक्षित नेऊन ठेवल्याचे ची माहिती आहे.