मुल तालुक्यात युरिया खताची प्रचंड टंचाईसदृश्य परिस्थिती

0
305
Advertisements

परिस्थिती आटोक्यात आणून खताचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी उलगुलान संघटनेचे निवेदन

चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन

Advertisements

मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे व इतर पीक घेतल्या जाते. सध्याच्या हंगामाला युरिया खताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आहे. परंतु तालुक्यात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला असून शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळणे कठीण झालेले आहे. शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देऊन युरिया खत घेण्यास भाग पडावे लागत आहे. प्रशासन व कृषी विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ युरिया खताचा पुरवठा मुबलक करण्यात यावा व शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवावे करिता उलगुलान संघटना शाखा मुल द्वारे तहसीलदार मुल यांना निवेदन देण्यात आले..
सदर विषयाची गंभीर दखल घेऊन दोन दिवसात शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा करण्यात यावा अन्यथा उलगुलान संघटना शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करणार. असा इशारा उलगुलान संघटना शाखा मुल द्वारा देण्यात आला.
निवेदन देताना निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, अक्षय दुमावार, रोहित शेंडे, शुभम उराडे, कुंदन कस्तुरे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here