Homeचंद्रपूरगोंडपिंपरीविध्यार्थीनीसोबत विनयभंग करनार्या संचालकाला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी 

विध्यार्थीनीसोबत विनयभंग करनार्या संचालकाला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी 

 

गोंडपिपरी / आकाश चौधरी

मिनीआयटीआय मध्ये शिवणकलेचे प्रमाणपत्र आणण्याकरिता गेलेल्या एका तरूणीवर संचालकाने दहा हजार रूपये देतो.आपण संबध प्रस्तापित करू अशी मागणी केली.तिचा विनयंभंग केला.दुस-या खोलीत असलेल्या तरूणीने आरडाओरड केल्यानंतर तिची कशीबशी सुटका झाली.गोंडपिपरी येथे दुपारी हा प्रकार रविवारला घडला.याप्रकरणी मिनीआयटीआयच्या संचालकाविरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्या त आला असून त्याला न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावन्यात आली आहे.
गोंडपिपरी येथे एक खाजगी मिनी आयटीआय आहे.कोेंढाणा येथील अमीत अलोणे हा मिनीआयटीआय चालवितो.यामाध्यमातून त्याने गडचिरोली जिल्ह्यातही जाळे पसरविले आहे. त्याही विध्यार्थ्यांच्या समस्या आजही कायम आहेत. तेथील अनेक विद्यार्थ्यांचे मुळ कागदपञ वापस न केल्याचे या प्रकरनावरून समोर आले. अमित अलोने यांनी मिनीआयटीआयच्या माध्यमातून शिवणक्लास व इतर बाबींचे प्रशिक्षण देत होते. करंजी येथील दोन तरूणींनी या मिनीआयटीयात शिवणक्लाससाठी प्रवेश घेतला.परिक्षाही झाली. त्यानी बोलविल्यानुसार डिप्लोमा घेण्याकरिता रविवारला आयटीआय मध्ये गेल्या.दरम्यान संचालक अमीत अलोणे याने एका तरूणीला दुस-या खोलीत मासिक पाळीबाबत सविस्तर लिहीण्यासाठी सांगितले.दुसरीच्या सोबत तो अलंगट करू लागला.त्याने तिला अश्लील चित्रही दाखविले.यांनतर तिचा विनयभंग केला.तुझ्यासोबत मी लग्न करतो.तुझ्या सोबत मला संबंध ठेवायचे असे म्हटले.सोबत यासाठी दहा हजार रूपये तिच्या बॅकेच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले.आणी यासाठी अॅडव्हान्स म्हणून त्याने पाचशेच्या दोन नोटा तिच्या हातात दिल्या.पण तरूणीने नकार दिला.अन दुस-या खोलीत असलेल्या मैत्रीणीने तिला आवाज मारताच हिच संधी साधून तिने आपली सुटका केली.यानंतर दोघेही घाबरलेल्या अवस्थेत आपल्या गावाला पोहचल्या.
घरी गेल्यानंतर तरूणीने घडलेला प्रसंग आईवडिलांना सांगितला.यानंतर त्यांनी थेट गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठल.पोलीसात घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली.तरूणी हि अल्पवयीन असल्याने विनयभंग करणा-या अमीत अलोणेविरूध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याला अटक करण्यात आली. दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी अमित अलोणेला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे सदर मिनीआयटीआयमध्ये शिक्षण घेणार्या विद्याथ्याभध्ये खळबळ माजली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!