युवा शेतक-यांचा आत्महत्येचा प्रयत्न

0
688

 

महापूराने दहा एकर शेती हातून गेली

Advertisements

गोंडपिपारी / आकाश चौधरी

Advertisements

संजय सरोवरच पाणी गोसीखुर्द धरणात सोडण्यात आले.यामुळे वैनगंगेला महापूर आला.पूराने गोंडपिपरी तालुक्यातील नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली.पुराने उध्वस्त झालेली शेती बघताच हादरलेल्या एका युवा शेतक-याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल (दि.२) गोंडपिपरी तालुक्यातील भनारहेटी गावात घडली.जखमी अवस्थेत शेतक-याला रूग्णालयात भरती करण्यात आले असून चंद्रपूरात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

भनारहेटी येथील केशव खमणकर याची वैनगंगा नदीकाठावर दहा एकर शेती आहे.वैनगंगा नदीला आलेल्या महापूराने खामनकर यांची दहा एकर शेती पुर्णत पाण्याखाली आली.दरम्यान सकाळी शेतात गेल्यानंतर पिकांची मातीमोल झालेली अवस्था बघून तो पुर्णत हादरला.अशातच केशवने विष प्राशन करून जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. कुटूबियांना हा प्रकार लक्षात येताच त्याला ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले.दरम्यान प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.वैनगंगेला आलेल्या महापूराने गोंडपिपरी तालुक्यातील जवळपास विस गावातील हजारो हेक्टर शेतपिकाचे पुर्णत नुकसान झाले आहे.हि गंभीर अवस्था लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत दयावी अशी मागणी शेतकरी बांधव करित आहेत.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here