विज कोसळल्याने दोघांचा मृत्यू ;गोंडपिपरी राजूरा तालुक्यातील घटना

507

गोंडपिपरी / राजूरा

शेतात काम करीत असतांना विज कोसळल्याने दोघां मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी , राजूरा तालुक्यात  घडली.रविंद्र रामटेके, ,लहानुबाई जाधव असे मृतकांची नावे आहेत.

रविंद्र रामटेके हे स्वताच्या शेतात काम करीत असतांना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ते राजूरा तालुक्यातील सिंधी येथिल रहीवासी होते.

दूसर्या घटनेत गोंडपीपरी तालुक्यातील परसोडी येथील  मत्ते यांच्या  शेतात मजुरी साठी काही महिला गेल्या होत्या. दरम्यान चार वाजेच्या सुमारास अचानक वादळी पाऊस आला अश्यातच वीज कडाडली आणि शेतात असलेली लहानुबाई जाधव वर वीज कोसडली त्यात तिचा मृत्यू झाला.