मी जिवंत आहे!नातेवाईकांनी केले अंत्यसंस्कार, पोलिस खुनाचा करत आहे तपास, पण ती परतली 

0
723

चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन

Advertisements

बिहार :
बिहार च्या वैशाली जिल्हात एक
प्रकार समोर आला आहे. बलात्कार आणि खून प्रकरणी पोलीस ज्या आरोपीचा शोध घेत होते, त्या प्रकरणातील मृत मुलीचा व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये मुलगी ‘मी’ जिवंत असल्याचं समांगत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुटूंबीयांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती.

Advertisements

रहिमपूर येथील बाकरपूरमध्ये राहणाऱ्या मुलीच्या वडिलांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्याच दुसऱ्या दिवशी एका मुलीचा मृतदेह सापडला, आणि मुलीसोबत बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली. मृतदेहाची ओळख न कळण्यासाठी तिच्या शरीरावर अ‍ॅसिड टाकून जाळण्यात आले होते. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन मारेकऱ्याचा तपास सुरु केला होता.

दरम्यान, ज्या मुलीचा पोलीस अपहरण आणि हत्येचा तपास करत होती. तिने एक व्हिडीओ प्रसार करत मी जिवंत असल्याचं सांगितल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी पोस्टमार्टम करुन हत्येचा एफआयआर केला. त्याच मुलीच्या मृतदेहावर तिच्या कुटूंबीयांनी अंत्यसंस्कार केले होते. तीच मुलगी आता १० दिवसांनी सर्वांसमोर आली आहे.

प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत मेनकाने सांगितलं की, तिने स्वतःच्या मर्जीने घरातून पळून जाऊन लग्न केलं. पण तिच्या कुटूंबीयांनी खोटा गुन्हा नोंद करुन त्याला हत्येचं प्रकरण बनवलं आहे. तिने तिच्या घरातील सदस्यांना सांगितलं होत की मी जिवंत आहे. तरीसुद्धा त्यांनी खोटा गुन्हा दाखल करत माझ्यावर अंत्यसंस्कारही केले. बेपत्ता झालेल्या मेनकानेच समोर येऊन स्पष्टीकरण दिल्याने पोलिसांसमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे. पोलिसांना आतापर्यंत मेनकाचा मृतदेह असल्याचं गृहीत धरुन तपास केला होता. मात्र, पुन्हा संपूर्ण प्रकरणाचा नव्याने तपास सुरु केला पोलिसांनी सुरु केला. अंत्यसंस्कार केलेला मृतदेह कोणाचा होता हे शोधून काढणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here