Homeराज्यइंजनिअरची नौकरी सोडली...! अन लावली चहाटपरी...! काय असावे कारण ?

इंजनिअरची नौकरी सोडली…! अन लावली चहाटपरी…! काय असावे कारण ?

सोशल मीडियावर सध्या एका चहावाल्या इंजिनिअरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. आयएएस अवनीश शरण यांनी ३० ऑगस्टला हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये तुम्हाला इंजिनिअर ते चहावाला याची संपूर्ण कहाणी वाचता येईल. या चहावाल्यानं वाढत्या बेरोजगारीत अनेकांना प्रभावित केलं आहे. कोणतंही काम लहान नसतं. हे या तरूणानं आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. आपण जे काम करतो यात आपल्याला आनंद मिळायला हवा असंही त्यानं म्हटलं आहे.

अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटरमध्ये लिहिले आहे की, आजच्या घडीला इतकी मेहनत आणि इमानदारी कुठेही दिसून येत नाही. या इंजिनिअर असलेल्या चहावाल्याला आपल्या कामातून आनंद मिळत आहे.

या ट्विटवरील पोस्टला आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

आपल्या चहाच्या टपरीवर त्यांने एक मेसेजसुद्धा लिहिला आहे, ” मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अनेक कंपन्यांमध्ये मी काम केलं आहे. पण त्या कामातून मला जे पैसे मिळत होते. त्यातून मी समाधानी नव्हतो. माझ्या मनात व्यवसाय करण्याची इच्छा होती. नेहमी माझ्या टेबलवर मनासारखा चहा मिळत नव्हता. मी सुरूवातीपासूनच चहाप्रेमी आहे. उत्तम चहा पिण्याची इच्छा नेहमी माझ्या मनात असायची. म्हणूनच मी चहाचं दुकान उघडायचं ठरवलं. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर मी चहावाला इंजिनिअर झालो.” सोशल मीडियावर या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसंच २ हजारांपेक्षा जास्त लोकांना या फोटोला लाईक केलं आहे. ३०० पेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!