Home चंद्रपूर वेकोलीतर्फे अवजड वाहण चालकांचे प्रशिक्षण सुरु

वेकोलीतर्फे अवजड वाहण चालकांचे प्रशिक्षण सुरु

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांनतर अनेक वाहण चालकांच्या हाताला मिळणार रोजगार

     चंद्रपूर – जिल्ह्यातील वेगवेगळया खणन उदयोगांमध्ये अवजड वाहण चालकांचे अनेक पदे रिक्त आहे. मात्र हे अवजड वाहण चालविण्याचा अनूभव नसल्याने स्थानिक वाहण चालकांना या रोजगारापासून वंचित राहावे लागत होते. हि बाब लक्षात घेता स्थानिक वाहण चालकांना खणन उद्योगांमधील अवजड वाहण चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोली प्रशासनाला केली होती. याची तात्काळ दखल घेत अवजड वाहण चालक प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत  वेकोली तर्फे वाहण चालकांना अवजड वाहणे व यंत्र चालविण्याचे व त्याची देखभाल करण्याचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. त्यामूळे आता अनेकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. विशेष म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या संदर्भात बैठक बोलावली होती. त्यामूळे आमदार किशोर जोरगेवार यांनी पालकमंत्री यांचेही आभार मानले आहे.
      औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. चंद्रपूरात जवळपास सर्व प्रकारचे कारखाने आहेत. असे असले तरी चंद्रपूरात बेरोजगारांची संख्या अधिक आहे. त्यामूळे या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान जिल्ह्यातील विविध खणन उद्योगांध्ये जड वाहणेयंत्र चालकांचे पदे रिक्त आहे. मात्र स्थानिक वाहण चालकांना हे अवजड वाहणे चालविण्याचा तसेच हे यंत्र हाताळण्याचा अनूभव नसल्याने वाहण चालकांना या रोजगारापासून वंचित राहावे लागत होते. तसेच हे वाहणे चालविण्याचे प्रशिक्षण महागडे असल्याने ते घेणे ही वाहण चालकांसाठी शक्य नाही. हि बाब लक्षात घेता वेकोली प्रशासनाच्या वतीने हे अवजड वाहणे व यंत्र हाताळण्याचे नि:शूल्क प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी वेकोली प्रशासनाला केली होती. तसेच या मागणीसाठी त्यांचा सातत्याने पाठपूरावा सुरु होता. अखेर त्यांच्या पाठपूराव्याला यश आले असून अवजड वाहण चालक प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत वेकोली तर्फे हे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पहिल्या टप्पात २५ चालकांची पहिली बॅच सुरु करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षणाअंतर्गत या चालकांना खणन उद्योगातील अवजड वाहणे चालविने त्यांची देखभाल करणेजड यंत्र हाताळण्याचे संपूर्ण प्रशिक्षण दिल्या जात आहे. प्रशिक्षण पूर्ण होताच कौशल्य प्राप्त चालकांना वेकोली प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारावर सदर चालक अवजड वाहण चालकांच्या जागा रिक्त असलेल्या खणन उद्योगांमध्ये नौकरीस पात्र ठरणार आहे. वेकोलीच्या वतीने हा उपक्रम पूढे ही सुरु राहणार असून गरजेनुसार चालकांना हे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामूळे अनेक बेरोजगार चालकांच्या हाताला खणन उद्योगांमध्ये रोजगार प्राप्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.  

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

सातबारा खोडतोड व वाटप जमीन “खरेदी-विक्री “प्रकरणात तलाठ्याने निष्काळजीपणा दाखवून सुध्दा त्याचेवर अद्याप कारवाई नाही ! कागद पत्रे मागण्यास या पलिकडे तहसील कार्यालयात येवू...

चंद्रपूर :-बल्हारपूर तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण उघडकीस आणणा-या प्रिया झांबरे यांना परत तहसील कार्यालयात कागदपत्रे मागण्यास येवू नये असे खडे बोल तहसीलदार...

101 सुरक्षा रक्षक सिएसटिपीएस मध्ये होणार पुर्ववत रुजु…आ. किशोर जोरगेवार यांनी घडवून आणली कामगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक…

चंद्रपुर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्याचा पाठपुरावा आणि प्रयत्नांनतर सिएसटीपीएस येथील नोंदणीकृत 101 सुरक्षा रक्षकांची नौकरीसाठी सुरु असलेली सहा वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

यूजीसी नेट’च्या अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा....

राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे) येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

Recent Comments

Don`t copy text!