Homeआरोग्यबुलडाणा आजही जिल्ह्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा आजही जिल्ह्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा,(जिमाका) दि.27 :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 50 अहवाल कोरोनानिगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये धामणगांवबढे ता. मोताळा येथील 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 12वर्षीय मुलगी, 47 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे धा. बढे येथे 6 रूग्ण आढळले आहे.
तसेच मोहनपुरा मलकापूर येथील 30 वर्षीय महिला, 17वर्षीय तरूण, 37 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय पुरूष संशयीत रूग्ण पॉझीटीव्ह आले आहे. तसेच मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष, मँगो हॉटेल, मेहकर येथील 22 वर्षीय पुरूष,घासलेटपुरा नांदुरा येथील 6 वर्षीय मुलगा, 43 वर्षीय पुरूष व दाल फैल खामगांव येथील75 वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे 15 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.
तसेच आज 1 रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्याला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणेसुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये चाळीस बिघा मलकापूर येथील 60 वर्षीय पुरूषरूग्णाचा समावेश आहे.  तसेचआजपर्यंत 2418 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 139 कोरोना बाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणेसुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या139 आहे.  तसेचआज 27 जुन रोजी 68 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 15 पॉझीटीव्ह, तर 50निगेटीव्ह आहेत. आज रोजी 101 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2418 आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 198 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 139 कोरोनाबाधीतरूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टीदेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात48 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!