लग्नाचा आग्रह करताच नकार देणाऱ्या तरुणावर बलात्कार तथा फसवणुकीचा गुन्हा दाखल…
प्रतिनिधी गौरव मोहबे
गोंदिया :- एका ३० वर्षीय तरुणाने ४२ वर्षीय महिलेला जाळ्यात ओढून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तत्पूर्वी तरुणाने आपण लग्न करून एकत्र राहण्याच्या भूलथापा दिल्या. तब्बल चार वर्षे दोघांमध्ये आकर्षण वाढत गेले. या दरम्यान महिलेने तरुणाकडे अनेकदा लग्नाचा आग्रह केला, परंतु त्याने टाळाटाळ करून फसवणूक केली. अखेर महिलेने गोंदिया शहर पोलिस ठाणे गाठून तरुणाविरोधात तक्रार नोंदवली.प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी नागपूर येथील तरुणावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित ४२ वर्षीय महिला ही गोंदिया शहराच्या श्रीनगर परिसरात वास्तव्यास आहे.काही वर्षांपूर्वी महिलेची ओळख नागपुरातील भारत नगर, गोकुळ डेअरीजवळ, कलमना मार्केट येथील ३० वर्षीय संशयित आरोपी बादल रतन दुर्गे याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर जवळीकता वाढीत झाले. त्यानंतर आरोपी तरुणाने
१३ एप्रिल २०२१ पासून ते १० सप्टेंबर २०२५ या
कालावधीत लग्नाचे आमिष
दाखवून महिलेशी
अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न
करणार म्हणून महिलेने तरुणाशी बोलणे
सुरु
ठेवले. अश्यातच आरोपी तरुणास लग्नाबाबत विचारले असता, त्याने नकार दिला. सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवून आता नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने गोंदिया शहर पोलिस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला
आहे. पुढील तपास गोंदिया शहर पोलिस प्रशासन करीत आहे.